मराठी बृहद्कोश

लेखमाला

नसती (?) उचापत

Submitted by आदूबाळ on Tue, 04/28/2020 - 10:38
एखाद्या शब्दाचा कोशातला आणि व्यवहारातला अर्थ वेगवेगळा असण्याची उदाहरणं कधीकधी बघायला मिळतात. अशा वेळी उत्स्फूर्तपणे येणारी प्रतिक्रिया म्हणजे, “ह्या:! काय फालतू कोश आहे! अर्थ चुकवून ठेवला आहे!” पण याबरोबरच एका आणखी शक्यता विचारात घ्यायला हवी, आणि ती म्हणजे काळाबरोबर शब्दाचा अर्थ बदलल्याची. ‘उचापत’ हा असाच एक शब्द आहे. हल्लीच्या वापरात 'उचापत'चा उपयोग बऱ्याचदा 'नसती' हे विशेषण लावून होतो.१ 'एखादी गोष्ट करायची गरज नसताना ती करणे किंवा करावी लागणे' असा त्याचा अर्थ लावला जातो. "कोणी सांगितली आहे ही नसती उचापत?" किंवा "अमुकतमुक काम होण्यासाठी खूप उचापती करायला लागल्या!" असं ऐकू येतं. पण कोश उघडून 'उचापत'चा अर्थ बघितला तर काहीतरी भलतंच दिसतं.